मराठी ग़ज़लमध्ये कचरा फार झाला, कोण साफ करणार?
मराठी ग़ज़लच्या विश्वात्मकतेची चर्चा करताना मला जास्त अवतरणं सुरेश भटांची द्यावी लागली, हे माझं नाही, मराठी ग़ज़लचं दुर्दैव आहे. मराठीत अजूनही सुरेश भटांना ओलांडून, मागे सारून, त्यांच्याही पुढे जाणारा ग़ज़लकार झाला नाही. समीक्षकांनी मराठी ग़ज़लकडे पाठ फिरवली. असं का व्हावं याचा तुम्ही विचार करणार का नाही? क्षमा करा, पण मराठी ग़ज़लची जरा जास्तच ‘चळवळ’ झाली आहे, हे त्याचं कारण आहे. .......